Advertisement

बीडीडी पुनर्विकासाचा प्रश्न अखेर सुटला!


बीडीडी पुनर्विकासाचा प्रश्न अखेर सुटला!
SHARES

मुंबई - गेली कित्येक वर्षे रखडलेल्या नायगांव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. कारण म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकत्याच या दोन्ही ठिकाणच्या पुनर्विकासाच्या निविदा अंतिम केल्या आहेत. त्यानुसार नायगावच्या पुनर्विकास शापुरजी-पालमजी कंपनीच्या हाती गेला आहे तर ना. म. जोशी येथील बीडीडीचा पुनर्विकास एल अॅण्ड टी करणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिली आहे. तर आता निविदा अंतिम झाल्याने महिन्याभरात बांधकामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले आहे.

वरळी आणि शिवडी वगळता ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडीच्या पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवल्या होत्या. पण या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने चक्क तीनदा निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली होती. अखेर तिसऱ्या मुदतवाढीत निविदेला प्रतिसाद मिळाला आणि एल अॅण्ड टी तसेच शापुरजी-पालमजी या दोन कंपन्या तांत्रिक आणि आर्थिक निविदेत पात्र ठरल्या. त्यामुळे बीडीडीच्या पुनर्विकासात आता नेमके या दोन कंपन्यांपैकी कोण बाजी मारते याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार या दोन्ही कंपन्यांनी बाजी मारली असून, शापुरजी-पालमजी कंपनीने नायगावचे तर एल अॅण्ड टीने ना. म. जोशी बीडीडी पुनर्विकासाचे कंत्राट मिळवले आहे.

पुनर्विकासातील महत्त्वाचा टप्पा आता पार झाल्याने म्हाडाकडून प्रत्यक्ष पुनर्विकासाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानुसार या दोन्ही ठिकाणी जिथे मोकळी जागा असेल तिथे सर्वात आधी टॉवर बांधण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. तर जिथे मोकळी जागा नसेल तिथे एक-एक इमारतीतील रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करत बांधकाम सुरू करण्यात येईल, असेही झेंडे यांनी स्पष्ट केले आहे. तर महिन्याभरात कामाला सुरूवात करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा