• रहिवाशांच्या हाकेला साद
SHARE

वरळी - कुणी पाणी देता का? पाणी या नागरिकांच्या केविलवाणी हाकेला अखेर पालिकेच्या जल खात्याने साद घातली आहे. वरळी बी. डी. डी. चाळ क्र. ८९ मध्ये पिण्याच्या पाण्याचा समस्येने रहिवाशी त्रस्त झाले होते. मुंबईत पावसाने धरणे तुडुंब वाहत असली तरी वरळीच्या बीडीडी चाळीत दुष्काळ पडल्याचा प्रत्येय येत होता. मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर जी दक्षिणमधील जल खात्याने नवीन जलवाहिनी टाकली. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने स्थानिक रहिवाशी सुखावले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या