Coronavirus cases in Maharashtra: 1082Mumbai: 642Pune: 130Navi Mumbai: 28Islampur Sangli: 26Kalyan-Dombivali: 25Ahmednagar: 25Thane: 24Nagpur: 19Pimpri Chinchwad: 17Aurangabad: 13Vasai-Virar: 10Latur: 8Buldhana: 7Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 4Usmanabad: 4Yavatmal: 3Ratnagiri: 3Palghar: 3Mira Road-Bhaynder: 3Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 64Total Discharged: 79BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

'बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन' (बेस्टकडून होणारे वाहतुकीचे उल्लंघन) असं या मोहीमेचं नाव असून, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया आणि बेस्ट प्रशासनाच्या सहयोगानं ही मोहीम राबवली जात आहे. तसंच, या मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन’ मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
SHARE

बेस्ट बसच्या प्रवाशांना होणाऱ्या गैर सोयीबाबत तक्रारी करण्यासाठी एक नवी मोहीम राबवली जात आहे. 'बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन' (बेस्टकडून होणारे वाहतुकीचे उल्लंघन) असं या मोहीमेचं नाव असून, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया आणि बेस्ट प्रशासनाच्या सहयोगानं ही मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, नुकत्याच सुरू झालेल्या या मोहिमेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अनेक तक्रारी दाखल

मुंबईतील सायन येथील राणी लक्ष्मी चौकातील परिसरात ५ बस थांबे आहेत. यामधील काही बस थांबे रिकामे असतात. त्यामुळं येथील काही बस थांबे एकत्रित करावे. नेरूळ बस थांब्यावर प्रवाशांनी हात दाखवूनसुद्धा बेस्ट चालक बसगाड्या थांबवत नाहीत. काही वेळा बेस्ट चालक बसगाड्या रिकाम्याच घेऊन जातात, अशा प्रकारच्या तक्रारी प्रवाशांनी 'बेस्ट ट्रॅफिक व्हायोलेशन' या मोहिमेंतर्गत कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाकडं पाठविण्यात आल्या आहेत.

बसच्या फेऱ्या कमी

मुंबईच्या विविध भागांतून आतापर्यंत अनेक तक्रारी कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडिया यांच्याकडं पाठविण्यात आल्या आहेत. या तक्रारी आल्यानंतर त्या बेस्ट प्रशासनाला पाठवून त्या सोडविल्या जात आहेत. जोगेश्वरी पूर्वेकडील रेल्वे स्थानक ते जयकोच परिसरापर्यंत बसच्या फेऱ्या कमी आहेत. गोरेगाव पूर्वेकडील बस क्रमांक ३२, ३३ आणि २६१ या गाड्या वेळेनुसार धावत नाहीत. त्यामुळं प्रवाशांना ताटकळत बस थांब्यावर उभं राहावं लागतं, अशाही तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.हेही वाचा -

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, मित्रांनी केला आनंद साजरासंबंधित विषय
संबंधित बातम्या