कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, मित्रांनी केला आनंद साजरा

हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. भारताच्या बाजूने १५ विरुद्ध १ अशा मतांनी हा निकाल देण्यात आला.

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, मित्रांनी केला आनंद साजरा
SHARES

कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलँडच्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिल्यावर देशभर  जल्लोष साजरा केला जात आहे. त्यानुसार जाधव यांच्या मुंबईतील निवासस्थानी उपस्थित राहात, त्यांच्या मित्रांनीदेखील आनंद साजरा केला. 

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. शिवाय त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही देण्यात आली आहे. भारताचा हा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. 

हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. भारताच्या बाजूने १५ विरुद्ध १ अशा मतांनी हा निकाल देण्यात आला. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी निकाल वाचन केले. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे यावेळी न्यायालयाने म्हटलं. 

जाधव यांच्या शिक्षेचा पुनर्विचार पाकिस्तान जोपर्यंत करत नाही तोपर्यंत  फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत घेण्याची परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना काउन्सिलर अॅक्सेसही दिला आहे. कुलभूषण प्रकरणी भारताने पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिलेले आव्हान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येते, हे आंतरराष्ट्रीय  न्यायालयाने स्पष्ट केले.  पाकिस्तानने केलेले युक्तीवाद फेटाळून लावले आहेत.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा