Advertisement

बेस्ट संपामुळं रिक्षा, टॅक्सी चालकांची मनमानी, प्रवाशांकडून दुप्पट भाडं वसूल


बेस्ट संपामुळं रिक्षा, टॅक्सी चालकांची मनमानी, प्रवाशांकडून दुप्पट भाडं वसूल
SHARES

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा बुधवारी दुसरा दिवस असल्यामुळं मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. परंतू, रस्त्यावर एकही बस धावत नसल्यामुळं प्रवासी पर्याय म्हणून रिक्षा-टॅक्सीनं प्रवास करत आहेत. मात्र, रिक्षा-टॅक्सी चालकांकडून बेस्टच्या संपाचा गैरफायदा घेत जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट चालू अाहे.


लांबच्या लांब रांगा

मध्य रेल्वे मार्गावरील दादर, भायखळा आणि सीएसएमटी, वडाळा रोड, घाटकोपर, कुर्ला, शिवडी तसंच पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, वांद्रे या स्थानकांबाहेर प्रवाशांच्या रिक्षा-टॅक्सीसाठी मोठ्या रांगा लागत आहेत. मात्र, बेस्टच्या संपामुळे रिक्षा, टॅक्सीचालकांकडून नियमित भाड्यांपेक्षा अधिक भाडं आकारलं जात अाहे.


चालकांची मनमानी

कुर्ला पश्चिमेकडून वांद्रे कुर्ला संकुल, कुटुंब न्यायालयाकडे जाण्यासाठी शेअर रिक्षाचालक २५ रुपयांऐवजी ४० रुपये भाड्याची मागणी करत होते. सीएसएमटी ते गेट वे ऑफ इंडिया येथे जाण्यासाठी नियमित भाड्याऐवजी शेअर टॅक्सी चालक २५ ते ३० रुपये भाड्याची मागणी करत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.


हेही वाचा -

बेस्ट संप : ५०० गाड्या रस्त्यावर उतरवण्याचा दावा फोल




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा