बिल न भरल्याने माटुंग्याच्या बाल सुधारगृहाची वीज कापली

  Matunga
  बिल न भरल्याने माटुंग्याच्या बाल सुधारगृहाची वीज कापली
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
  मुंबई  -  

  माटुंगा येथील डेव्हिड ससून बाल सुधारगृहातील वीज वर्षभरापासून बील न भरल्याने शुक्रवारी बेस्टने या सुधारगृहाची वीज कापली. परिणामी ऐन गर्मीच्या काळात या मुलांना पंख्याविना संपूर्ण रात्र सुधारगृहाबाहेर काढावी लागली.

  गेल्या काही वर्षांत बाल सुधारगृहातील मुलांच्या संगोपनासाठी शासनाकडून दिला जाणारा तुटपुंजा निधी कमी पडत असल्याने कर्मचाऱ्यांना देणगी स्वरुपात आलेल्या पैशांवर मुलांचा सांभाळ करावा लागत आहे. बिकट अार्थिक परिस्थितीमुळे मुलांना योग्य उपचार देखील मिळत नसल्याने उपचाराविना अनेक मुलांचा याठिकाणी मृत्यू देखील झाला आहे. तरी देखील सरकार या मुलांच्या भविष्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने माटुंगा येथील डेव्हिड ससून बालसुधारगृहातील 17 लाख 70 हजारांचे वीज बील न भरल्याने शुक्रवारी बेस्टने या सुधारगृहाची वीज पूर्णपणे खंडित केली. सध्या या सुधारगृहात दीडशे मुले वास्तव्यास असून, विज खंडित झाल्याने या मुलांना शुक्रवारी दुपारपासूनच पंख्याविना दिवस काढावा लागला. शुक्रवारची रात्र देखील या मुलांनी अंधारात आणि पंख्याविनाच काढली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.