Advertisement

मागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम, बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा

कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवाशर्तीबाबत तातडीनं वाटाघाटी सुरू कराव्यात या मागणीसाठी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप करण्याच्या निर्णयावर बेस्ट कर्मचारी ठाम आहेत. तसंच, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत संप मागे न घेण्याचं निर्धार कर्मचाऱ्यांनी केली

मागण्या मान्य न झाल्यास संपावर ठाम, बेस्ट कर्मचाऱ्यांचा इशारा
SHARES

आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी वर्षाच्या सुरूवातीलाच बेस्ट कर्मचारी तब्ब्ल ९ दिवस संपावर गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवाशर्तीबाबत तातडीनं वाटाघाटी सुरू कराव्यात या मागणीसाठी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप करण्याच्या निर्णयावर बेस्ट कर्मचारी ठाम आहेततसंचजोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीततोपर्यंत संप मागे न घेण्याचं निर्धार कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत सोमवारी वडाळा आगारात युनियन व कर्मचाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला

सामंजस्य करार

संप मागे घेतेवेळी बेस्ट प्रशासन व कर्मचारी संघटनेत सामंजस्य करारदेखील पार पडला. त्यानंतर बेस्ट वर्कर्स युनियननं कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला चारवेळा पत्रही पाठवलं आहे. मात्र, या पत्राला प्रतिसाद मिळत नसल्यानं संघटनेनं संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात सोमवारी वडाळा आगारात युनियन व कर्मचाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

न्यायहक्कांवर गदा

बेस्टमधील मान्यताप्राप्त बेस्ट वर्कर्स युनियन आणि द बॉम्बे इलेक्ट्रीकल वर्कर्स युनियनला 'महाराष्ट्र औद्याोगिक संबंध कायद्या'तून वगळल्याची अधिसूचना राज्य सरकारनं काढली आहे. त्यावरून कामगारांच्या न्यायहक्कांवर गदा येणार असून, त्याविरोधात २ ते ३ दिवसांत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा - 

रोहीत आणि माझ्यात ‘आॅल इज वेल’- विराट कोहली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा