Advertisement

माधवी जुवेकरला बेस्टकडून नोटीस


माधवी जुवेकरला बेस्टकडून नोटीस
SHARES

वडाळा आगारातील डान्स प्रकरणी अभिनेत्री माधवी जुवेकर आणि इतर कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. बुधवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओत जुवेकर यांच्या सोबत इतर कर्मचारी सुद्धा नाचताना दिसत असल्याने या सर्वांना नोटीस पाठवण्यात आली आहे. एवढंच नाही, तर महापालिका आयुक्तांनी देखील या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यामुळे आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


काय आहे प्रकरण?

दसऱ्याच्या निमित्ताने वडाळा बेस्ट आगारातील कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात अभिनेत्री माधवी जुवेकर तोंडात नोट पकडून सहकारी महिलेसोबत नाचताना आणि इतर कर्मचारी त्यांच्यावर नोट उडवतानाचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियात व्हायरला झाला.

त्यामुळे वडाळा आगार नक्की डान्स बार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. याप्रकरणी माधवी जुवेकरने स्पष्टीकरण देत नोटा बनावट असल्याचा दावा करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


व्हिडीओच्या चौकशीचे आदेश

बेस्ट प्रशासनाने व्हिडिओच्या चौकशीचे आदेश देतानाच नोटीस पाठवली आहे. या चौकशीत कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा