Advertisement

भीमा कोरेगाव हिंसाचार: महाराष्ट्र बंदची हाक

मिलिंद एकबोटे अाणि संभाजी भिडे हे प्रमुख असलेल्या हिंदू एकता अाघाडी अाणि शिवराज प्रतिष्ठानने स्वतःच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली अाणि त्यांनी गाड्याही पेटवल्या, असा अारोप प्रकाश अांबेडकर यांनी केला अाहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार: महाराष्ट्र बंदची हाक
SHARES

पुण्यातील भीमा-कोरेगांव येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश अांबेडकर यांनी हिंदू एकता अाघाडी अाणि शिवराज प्रतिष्ठानने ही दंगल घडवून अाणली, असा सनसनाटी अारोप केला अाहे. मिलिंद एकबोटे अाणि संभाजी भिडे हे प्रमुख असलेल्या हिंदू एकता अाघाडी अाणि शिवराज प्रतिष्ठानने स्वतःच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली अाणि त्यांनी गाड्याही पेटवल्या, असा अारोपही प्रकाश अांबेडकर यांनी केला अाहे.


अन्यथा परिस्थिती हाताबाहेर

सोमवारी ही घटना घडली, तेव्हा मी या घटनेची कल्पना मुख्यमंत्री अाणि गृहराज्यमंत्र्यांना दिली होती. लोक अांदोलन करत असतील तर ते थांबविण्याची जबाबदारी सरकारची अाहे. मुख्यमंत्र्यांनी शोधमोहीम थांबवावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. शासनाच्या निषेधार्थ मी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देत अाहे. महाराष्ट्र लोकशाही अाघाडी, महाराष्ट्र डावी अाघाडी अाणि २५० संघटना मिळून या बंदची हाक दिली अाहे, असेही प्रकाश अांबेडकर यांनी सांगितले. पण हा बंद शांततेत पार पडावा, असंही अावाहन मी करत अाहे.


९ जणांना अटक

अखिल भारतीय ब्राह्मण सभा, समस्त हिंदू अाघाडी अाणि पेशवांच्या वारसांनी भीमा-कोरेगाव येथील कार्यक्रमाला विरोध केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेसोबत अाम्ही कार्यक्रमापूर्वी चर्चा केली होती, त्यानंतर त्यांचा विरोध मावळला होता. पण सोमवारी कोरेगाव स्तंभाकडे येणाऱ्यांवर गावकऱ्यांनी चर्चा केली. गोविंद गायकवाड यांची समाधी उद्ध्वस्त करणाऱ्यांमध्ये ४९ अारोपींचा समावेश असून त्यापैकी ९ जणांना अटक करण्यात अाली अाहे.


तर गावांचे अनुदान बंद करावे

हिंदुत्ववादी संघटनांना या कारस्थानात मदत करणाऱ्या कोरेगाव ते शिरूर अाणि कोरेगाव ते चाकण परिसरातील गावांचे अनुदान बंद करावे, अशी मागणीही प्रकाश अांबेडकर यांनी केली अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा