Advertisement

महाराष्ट्रात भीम आर्मीची स्थापना


महाराष्ट्रात भीम आर्मीची स्थापना
SHARES

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात दलितांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी रविवारी दादर येथे बैठकही घेण्यात आली. सहारनपूरसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी उत्तर प्रदेशात यापूर्वीच भीम आर्मी संघटनेची स्थापना करण्यात आली.

उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी लढवय्या अशा भीम आर्मी संघटनेची स्थापना करत जातीयवाद्यांना जेरीस आणले आहे. ग्रामीण भागात होणारे अत्याचार रोखण्यासाठी या संघटनेने रस्त्यावरील लढाई लढली. या संघटनेची हीच विचारधारा महाराष्ट्रात रुजवण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी मुंबईच्या दादर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीम आर्मीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक तरुण उपस्थित राहिले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी अशोक कांबळे आणि मुंबई अध्यक्षपदी रत्नाकर डावरे यांची नेमणूक करण्यात आली. उत्तर प्रदेशात भीम आर्मीची स्थापना करणारे चंद्रशेखर आझाद यांची पोलिसांनी सुटका केल्यानंतर त्यांची पहिली सभा मुंबईत होणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा