Advertisement

भीमा-कोरेगाव दगडफेकीचे मुंबईत पडसाद, बेस्ट फोडल्या


भीमा-कोरेगाव दगडफेकीचे मुंबईत पडसाद, बेस्ट फोडल्या
SHARES

८.०५ - शाळा-कॉलेजांना बुधवारी सुट्टी नाही. सर्व कामकाज नियमित सुरु राहणार

७.५८ - वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर लोकल वाहतूक सुरळीत, हार्बरवर गाड्या उशीराने 

७.२४ - एलबीएस मार्गावर काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही काही ठिकाणी ट्रॅफिक

६.१० - भारिपच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला राज्यातल्या २५०हून अधिक डाव्या आणि पुरोगामी संघटनांचा पाठिंबा

६.०० - मंत्रालयात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

५.३० - मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

५.४२ - लांब पल्ल्याच्या उपनगरीय लोकल सुरळीत सुरु - पश्चिम रेल्वे

५.४० - मुंबईत घडलेल्या विविध हिंसक घटनांमध्ये तब्बल १०० जणांना अटक - मुंबई पीआरओ

५.३० - मुंबईत घडेलेल्या जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांना आधीच घरी जाण्याची परवानगी

५.१२ - हार्बर लाईनवरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

५.०० - भीमा-कोरेगाव प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा न्यायालयीन चौकशीचा निर्णय, तसेच युवकाच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार, मृताच्या नातेवाईकांना१० लाखांची मदत 

४.३० - हिंदू एकता मंचाचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुण्यातल्या पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

४.०० - २० बेस्ट आणि १३४ एसटी बसेसची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

३.३५ - भीमा-कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी दिली बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक


पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीचे तीव्र पडसाद मंगळवारी मुंबईत उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासून आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरला. चेंबूूर, घाटकोपर, मुलुंड, गोवंडी, सायन अशा अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी दुकाने बंद पाडण्यात आली. चेंबूर रेल्वे स्थानकावर रेल रोकोही करण्यात आला. दरम्यान मुंबईत तणावपूर्ण शांतता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करून शांततेचं आवाहन केलं आहे.




भीमा-कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो अनुयायी १ जानेवारीला जमले होते. सकाळी ८-९ वाजेच्या सुमारास भीमा-कोरेगावनजीकच्या वढु बुद्रुक येथे दोन गटांमध्ये वादावादी झाली, त्यातून पुढे दगडफेक आणि मग जाळपोळीसारख्या घटना घडल्या नि भीमा-कोरेगाव, वढु बुद्रुक, शिक्रापूर, पेरणफाटा परिसरात तणाव निर्माण झाला. या जाळपोळीत एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद मंगळवारपासून मुंबईतील विविध ठिकाणी उमटू लागले आहेत.



या घटनेचा आंबेडकरी अनुयायी, संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर अशा ठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणची दुकाने बंद करत आहेत. चेंबूरच्या अमर महल येथे रास्ता रोको करण्यात आला असून काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडल्याचं समजत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या या आंदोलनामुळे इस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मंगळवारी दिले आहेत. तर या घटनेत मृत झालेल्या तरूणाच्या नातेवाईकाला १० लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा