Advertisement

भिवंडी इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मत्यू, मदतकार्य अद्याप सुरूच

भिवंडी इथं सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या आसपास ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर गेला आहे.

भिवंडी इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मत्यू, मदतकार्य अद्याप सुरूच
SHARES

भिवंडी इथं सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या आसपास ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर गेला आहे. तर २० ते २५ जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावर एनडीआरआएफ, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. नुकतीच मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणार असल्याचं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.


जखमींची नावं

  • हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
  • रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
  • मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
  • शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
  • मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
  • कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
  • रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
  • अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
  • आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
  • जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
  • उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)
  • आमीर मुबिन शेख (पु/१८ वर्ष)
  • आलम अन्सारी (पु/१६ वर्ष)

मृतांची नावं

  • झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
  • फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
  • आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
  • बब्बू(पु/२७वर्ष)
  • फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
  • फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
  • उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
  • असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
  • अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
  • सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

सोमवारी पहाटे ३.४० वाजता ही दुर्घटना घडली. यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे इमारत कमकुवत झाली होती. यामध्ये २१ कुटुंबं राहत होती. इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट केल्या आहेत.

दरम्यान घटनेनंतर स्थानिक लोकांनी २० लोकांना बाहेर काढले. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. ही इमारत ३० वर्षे जुनी होती. आधीच धोकादायक घोषित केलं होतं. दोनदा नोटिसही बजावण्यात आली होती.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा