Advertisement

सरकारी कार्यालयांत बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू

बायोमेट्रिक हजेरीची पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षत घेता ही बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली होती.

सरकारी कार्यालयांत बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू
SHARES

बायोमेट्रिक हजेरीची पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षत घेता ही बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्यात आली होती. परंतू, आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानं मंत्रालयासह इतर सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीची पद्धत सुरू करण्यात येणार आहे.

त्यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागानं दिले असून जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ मंत्रालयासह शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर राज्यभरातील सरकारी कार्यालय विशेष करून मंत्रालयातील बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता 'ब्रेक द चेन'अंतर्गत जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यातील सरकारी कार्यालये १०० टक्के उपस्थितीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार ऑगस्ट २०२१ पासून पूर्ण क्षमतेनं कार्यालयं सुरू झाल्यानंतर राज्य सरकारनं बंद केलेली बायोमेट्रिक पद्धत पुन्हा एकदा सुरू करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन होते. अखेर त्यासाठीची नियमावली जाहीर करताना सामान्य प्रशासन विभागानं मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक पद्धत सुरू करण्याची मुभा दिलेली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा