Advertisement

शिवसेनेचा मेट्रोला विरोध का?


शिवसेनेचा मेट्रोला विरोध का?
SHARES

बेस्ट उपक्रमाला सक्षम बनवण्यासाठी मेट्रो रेल्वे बेस्ट उपक्रमामार्फतच चालवण्यात यावी, अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्षांसह आजही शिवसेनेच्यावतीने होत आहे. बेस्टला मेट्रो चालवायला देण्याची मागणी करता, तर मग मेट्रोच्या यार्डला विरोध का? असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेनेला केला.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मेट्रोच्या मुद्यावरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी भविष्यात मेट्रो-मोनो ही बेस्टतर्फे चालवण्यात यावी, अशी मागणी केली.

या मागणीचा धागा पकडत मनोज कोटक यांनी यापूर्वी माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि यशोधर फणसे यांनीही अशाच प्रकारे मागणी केली होती, असं सांगत त्यांच्या छापील भाषणांचा प्रति सभागृहात दाखवल्या. मेट्रो रेल्वे ही बेस्टच्यावतीने जर चालवायची मागणी शिवसेनेची असेल, तर मग यार्डाचे काम सुरु होऊ द्या. मेट्रो कास्टींग यार्डला विरोध का केला जातो?, असा सवाल त्यांनी केला.

सभागृहनेते यशवंत जाधव यांनी आपल्या भाषणात कोटक यांचा समाचार घेत शिवसेनेचा विरोध मेट्रोला नाही तर मेट्रोच्या नावाखाली होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला आहे, असं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा