Advertisement

महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत पहारेकरीच सरस


महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत पहारेकरीच सरस
SHARES

मुंबई महापालिकेची अर्थसंकल्पीय चर्चा मागील आठवड्यात पार पडली. या अर्थसंकल्पीय चर्चेत पहारेकरी असलेल्या भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. या चर्चेत तब्बल १२८ जणांची भाग घेतला असून यामध्ये भाजपाच्या सर्वाधिक ६० नगरसेवकांनी भाग घेत सभागृहात आपली चमक दाखवून दिली. त्याखालोखाल शिवसेनेच्या केवळ ४९ नगरसेवकांनीच भाग घेतला होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत भाजपाने आपल्या ८० टक्के नगरसेवकांना अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घ्यायला लावून भाजपा संसदीय कामकाज पुढे असल्याचे दाखवून दिले.


७ दिवस ४२ तास झाली चर्चा

मुंबई महापालिकेचा सन २०१८-१९चा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी ३ मार्च रोजी महापालिका सभागृहापुढे मांडला. यावेळी त्यांनी १ तास ०५ मिनिटे भाषण करत त्यांनी अर्थसंकल्पावर आपले विचार मांडले. त्यानंतर १२ मार्च रोजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ४९ मिनिटे भाषण करत अर्थसंकल्पावर आपले विचार मांडले. या माध्यमातून अर्थसंकल्पीय चर्चेला सुरुवात झाली. तब्बल ७ दिवस आणि ४२ तास चाललेल्या चर्चेत अध्यक्षांसह एकूण १२८ नगरसेवकांनी भाग घेतला होता. मागील वर्षी अर्थसंकल्पावर ३९ तास चर्चा झाली होती. यामध्ये ९३ नगरसेवकांनी भाग घेतला होता. त्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पीय चर्चेत मागील वेळच्या तुलनेत अधिक ३५ नगरसेवकांनी भाग घेतला आहे.


वेळेअभावी घातली दहा मिनिटांची मर्यादा

चर्चेच्या पाचव्या दिवसापर्यंत सर्व नगरसेवकांना भाषणासाठी कोणत्याही वेळेचे बंधन घालण्यात आले नव्हते. परंतु पाचव्या दिवशी तब्बल ७० नगरसेवकांनी भाषणासाठी नावे दिल्यानंतर संध्याकाळी चार नंतर प्रत्येक नगरसेवकाला केवळ दहा मिनिटेच बोलायची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा महापौरांनी सभागृहात केली. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ४० मिनिटे भाषण केल्यानंतर भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्यापासून भाषणाचा वेळ निश्चित करण्यात आला. शेवटच्या दिवशी ज्येष्ठ नगरसेवक, माजी महापौर आणि गटनेत्यांसाठी वेळेची मर्यादा नव्हती. तरीही काही ज्येष्ठ नगरसेवकांनी ३० ते ४० मिनिटांपेक्षा अधिक बोलण्याचे टाळले.


भाषणात भाग घेणारे नगरसेवक

शिवसेना - ४९
भाजपा - ५९
काँग्रेस - १३
समाजवादी - ०३
राष्ट्रवादी काँग्रेस - ०३
एमआयएम - ०१


जास्त वेळ भाषण करणारे नगरसेवक

शितल म्हात्रे (शिवसेना) - १ तास २९ मि.
डॉ. सईदा खान (राष्ट्रवादी काँग्रेस) - १ तास ०४ मि.
हरिष छेडा (भाजपा) - १ तास ०३ मि.
अश्रफ आझमी (काँग्रेस) - १ तास ०१ मि.
गणेश खणकर (भाजपा) - ५२ मि.


सर्वात कमी भाषण करणारे नगरसेवक

प्रकाश मोरे (भाजपा) - ०३ मिनिट
जितेंद्र पटेल (भाजपा) - ०४ मिनिट
आशा मराठे (भाजपा) - ०४ मिनिट
सुरेखा लोखंडे (भाजपा) - ०४ मिनिट
संगिता शर्मा (भाजपा) - ०५ मिनिट


प्रभावी भाषण करणारे ३ गटनेते

रईस शेख - समाजवादी पक्ष
राखी जाधव - राष्ट्रवादी काँग्रेस
मनोज कोटक - भाजपा


इच्छा असूनही न बोलणारे

मंगेश सातमकर - शिवसेना
दिलीप लांडे - शिवसेना
राजुल पटेल - शिवसेना
विशाखा राऊत - शिवसेना
रमाकांत रहाटे - शिवसेना



हेही वाचा

फक्त शेरोशायरीच नवी! अर्थसंकल्पात रेटले जुनेच प्रकल्प


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा