Advertisement

वांद्र्यात साकारणार मुंबईतला पहिला योगा पार्क!


वांद्र्यात साकारणार मुंबईतला पहिला योगा पार्क!
SHARES

योगाप्रेमींसाठी एक खुशखबर आहे. खास करून वांद्रे भागात राहणाऱ्यांसाठी तर ही नक्कीच पर्वणी आहे, असं म्हणायला हरकत नाही! हिरव्यागार गवतावर आणि मस्त खुल्या गार्डनमध्ये योगा करायला योगाप्रेमींना नक्कीच आवडेल. योगीप्रेमींची हीच इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे.

२६ जानेवारी २൦१८ ला वांद्र्यामध्ये योगा पार्क सुरू करण्यात येणार आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत एक एकर जमिनीवर योगा पार्क प्रकल्पाचं उद्घाटन केलं.


काय आहे योगा पार्कची संकल्पना?

या प्रोजेक्टचे आर्किटेक अनबुसिवन रंगनाथन आहेत. या प्रोजेक्टचे काम दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी जवळपास १ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. व्यवसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजेच सीएसआर (CSR) विभाग हा योगा पार्कच्या खर्चाची जबाबदारी उचलणार आहे. पार्कच्या भिंतींवर योगाच्या आसनांचे फोटो लावण्यात येणार आहेत.


पार्कमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पार्कमध्ये पाणी साचणार नाही. पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्यात येईल. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे झाडांना आणि पार्कमधल्या एकूणच वातावरणाला काही धोका उद्भवणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.

अनबुसिवन रंगनाथन, आर्किटेक्ट

वांद्रे आणि पार्कच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांना नक्कीच योगा पार्कचा फायदा होईल. शिवाय, हा योगा पार्क अनेकांना योगा करण्यास प्रवृत्त करेल यात शंका नाही.



हेही वाचा

फेरी बोटने गाठा 'मुंबई टू गोवा'

मुंबईत पिंगा घालणारे 'चतुर' आहेत तरी कोण?


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा