घाटकोपरच्या विद्यानिकेतनमध्ये रक्तदान शिबीर

 Ghatkopar
घाटकोपरच्या विद्यानिकेतनमध्ये रक्तदान शिबीर
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर - विद्यानिकेतन महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिमखाना कमिटी आणि एनएसएस युनिटतर्फे शुक्रवारी 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत हे शिबीर सुरू होते. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात महाविद्यालयातील 50 जणांनी रक्तदान केले.

रक्तदान केलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरात विद्यानिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम कदम, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राम तिवारी, जिमखाना कमिटी प्रमुख कमलदास वाघ आणि एनएसएसचे धमेंद्र जैस्वार आदी मान्यवर रक्तदान शिबिरात उपस्थित होते.

Loading Comments