चर्चगेट स्थानकावर रक्तदान शिबीर

 Churchgate
चर्चगेट स्थानकावर रक्तदान शिबीर

चर्चगेट रेल्वे स्थानकावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयात अपात्कालिन परिस्थितीत अनेक वेळा रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशावेळी रक्त उपलब्ध व्हावे यासाठी गुरुवारी सेवा ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी बुधवारी देखील दादर, वांद्रे, अंधेरी स्थानकांवर रक्तदान शिबीर राबवण्यात आले. यामध्ये 80 प्रवाशांनी रक्तदान केले.

रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी विशेष भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले. चार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबीरातील संस्थांना मदत केली. गुरुवरी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही शिबीर घेण्यात आली.

रक्ताची गजर आपल्याला वर्षाच्या 12 महिने आणि महिन्याच्या 30 दिवस लागते. त्यामुळे आपण सगळ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला पाहिजे

 - अनिल गोरे, रक्तदान शिबिराचे आयोजक 

Loading Comments