Advertisement

मुंबई महापालिकेतील सॅप प्रणाली ११ ते २८ जूनपर्यंत बंद

महापालिकेने नागरिक, कंत्राटदार तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध कामकाजासाठी सॅप (SAP system) ही मुलभूत सॉफ्टवेअर प्रणाली सुरु केली आहे.

मुंबई महापालिकेतील सॅप प्रणाली ११ ते २८ जूनपर्यंत बंद
SHARES

मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) सॅप प्रणाली (SAP system) ११ ते २८ जून या कालावधीत बंद राहणार आहे. सॅप प्रणालीमध्ये बदल करून सॅप हाना प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सॅप हाना (SAP Hana) या अद्ययावत आवृत्‍तीमध्‍ये अद्ययावत बदल करण्‍यासाठी सॅप प्रणाली बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

सॅप प्रणालीद्वारे कार्यालयात न येता बिल भरणे, प्रमाणपत्र मिळवणे, विविध प्रस्तावाना मंजुऱ्या देणे आदी कामं केली जातात. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नागरिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वोत्तम व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेने नागरिक, कंत्राटदार तसेच महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध कामकाजासाठी सॅप (SAP system) ही मुलभूत सॉफ्टवेअर प्रणाली सुरु केली आहे. सॅपप्रणाली अद्ययावत व सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच सर्वोत्तम सेवा देता यावी यासाठी महापालिकेने सॅप हाना (SAP Hana) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्‍वीकार करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्‍या वापरात असलेली सॅप मूलभूत प्रणाली ही सॅप हाना या नवीन व अद्ययावत अशा आवृत्‍तीमध्‍ये स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

सॅप हाना या नवीन प्रणालीमध्ये दस्तऐवज साठवण्याची सुविधा, नवीन अ‌ॅप्लिकेशन्स अधिक जलदरित्या तपासून कार्यान्वित करणे, अधिक जलद वेगाने प्रक्र‍िया करणे, नवीन यूजर इंटरफेस, अधिक प्रतिसादात्मक व वापरण्यास उपलब्ध आहेत. या अद्ययावत लाभांसाठी सध्या कार्यान्वित असलेली सॅप प्रणालीचे सर्व्हर्स बंद करून त्याचे सॅप हाना प्रणालीवर स्‍थानांतरासह अद्ययावतीकरण केलं जाणार आहे.

सध्याच्या क्लाउड सेवांचा कंत्राट कालावधी संपणार असल्याने महानगरपालिकेची संगणक प्रणाली नवीन क्लाऊडवर स्थलांतरित करण्याचे कामकाजही या कालावधीमध्येच करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला सॅप प्रणाली ११ जून २०२१ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवावी लागणार आहे. संपूर्ण सॅप प्रणाली बंद ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत नागरिक व कर्मचारी सॅप प्रणालीवरील व्यवहार बंद राहणार आहे. त्यामुळे आवश्‍यक कामकाज त्‍वरित पूर्ण करून घ्यावेत असे आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा