Advertisement

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

मुंबईत आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांना १२०० रुपये दंड भरावा लागणार आहे. या वाढीव दंड रकमेने कुठेही थुंकणाऱ्यांना जरब बसणार आहे.

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय
SHARES

मुंबईत आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांना १२०० रुपये दंड भरावा लागणार आहे. या वाढीव दंड रकमेने कुठेही थुंकणाऱ्यांना जरब बसणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने विविध आजार पसरू शकतात हे लक्षात घेऊन पालिकेकडून (bmc) त्यावर कारवाई केली जाते. महापालिकेकडून त्यावरील कारवाईतील दंडाची रक्कम २००रुपयांवरून थेट १,२००पर्यंत नेण्यात येणार आहे. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर पालिकेने ही कारवाई अधिकच तीव्र केली आहे. तरीही थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने पालिकेने त्या दंडाच्या रकमेत वाढ करण्याचे ठरविले असून त्या प्रस्तावास पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मान्यता दिली आहे.

सध्या महापालिकेकडून त्यासाठी २०० रुपये दंड आकारला जात आहे. त्यासंदर्भात उच्च न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी दिलेल्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासंदर्भातील एका सुनावणीदरम्यान पालिकेकडून २०० रुपये दंड आकारण्यावरून विचारणा केली होती. पोलिसांकडून थुंकणाऱ्यांविरोधात १,२०० रुपये दंड आकारला जात असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पालिकेनेही दंडाच्या रकमेत वाढ करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यानुसार नवीन दंडाची रक्कम ही १,२०० पर्यंत वाढविताना त्यास पालिका सभागृहाची संमती घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दंडाची रक्कम २०० रुपये एवढीच असल्यानं या रकमेत वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविल्याची माहिती समोर येत आहे. त्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया हाती घेण्यास महापालिका आयुक्तांनी संमती दिली आहे.

महापालिकेनं गेल्या ६ महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत २८ लाख रुपयांची दंडवसुली केली आहे. १४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून २८ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.



हेही वाचा

तौंते चक्रीवादळग्रस्तांना २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर

पदपथांवर झाडं लावू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा