Advertisement

कचऱ्यांची विल्हेवाट न लावणाऱ्या १५०० सोसायट्यांवर बीएमसीची कारवाई

कचऱ्यांची विल्हेवाट न लावणाऱ्या १५०० गृहनिर्माण संस्था व हॉटेलांवर मुंबई महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे.

कचऱ्यांची विल्हेवाट न लावणाऱ्या १५०० सोसायट्यांवर बीएमसीची कारवाई
SHARES

कचऱ्यांची विल्हेवाट न लावणाऱ्या १५०० गृहनिर्माण संस्था व हॉटेलांवर मुंबई महापालिकेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. या गृहनिर्माण संस्था आणि हॉटेल दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करतात. ओला कचऱ्याच्या विल्हेवाटीचा नियम धुडकावल्याने पालिकेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लवकरच न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत.

२० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या आणि रोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व हॉटेलांनी कचऱ्याचं वर्गीकरण करणे आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणं पालिकेने बंधनकारक केलं आहे. प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने या सोसायट्या आणि हॉटेलांना वारंवार मुदतवाढ दिली. मात्र, तरीही त्यांनी प्रकल्प उभारण्यासाठी काहीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळे आता पालिका १५०० सोसायट्यांवर कारवाई करणार आहे. 

पालिकेने आत्तापर्यंत ३ हजार १२५ गृहनिर्माण संस्था व हॉटेलना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यापैकी १६१९ ठिकाणी कचरा विल्हेवाटीचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. उरलेल्या सोसायट्यांना पालिकेने प्रकल्प सुरू करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊन ऑक्टोबर २०१९ ही अंतिम मुदत दिली होती. त्यानंतरही प्रकल्प न उभारल्याने दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. ऑक्टोबर २०२० पर्यंत ४७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा