Advertisement

मास्कविना फिरणाऱ्याविरुद्ध महापालिकेची कारवाई


मास्कविना फिरणाऱ्याविरुद्ध महापालिकेची कारवाई
SHARES

मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांविरुद्धची कारवाई महापालिकेनं वेगात सुरू ठेवली आहे. २३ डिसेंबपर्यंत ८ लाख २० हजारांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून पालिकेनं मास्कविना फिरणाऱ्यांकडून तब्बल १६ कोटी ७६ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. यापैकी १ लाख ३७ हजार नागरिक गेल्या १० दिवसांत पकडलेले आहेत.

मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यास पालिकेने एप्रिल महिन्यापासून सुरुवात केली. सुरुवातीला १००० रुपये असलेला दंड वसूूल करण्यात येत होता. मात्र नंतर तो २०० रुपये करण्यात आला. मात्र तरीही लोक मास्कविना सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्यामुळे महापालिकेनं अशा लोकांविरुद्धची कारवाई अधिक काटेकोरपणे करायला सुरुवात केली आहे.

गेल्या महिन्याभरात मुंबईत मुखपट्टीविना फिरणाऱ्या सुमारे ४ लाख लोकांना पकडण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून नोव्हेंबरमध्ये जेवढ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली त्याच्या दुप्पट नागरिक या एका महिन्यात आढळले आहेत. दंड वसूल करण्याबरोबर या लोकांना समज देऊन मग एक मास्कही मोफत दिली जात आहे.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा निर्धास्तपणा आला आहे. त्यातच नाताळ, नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष व ब्रिटनमध्ये करोनाचा नवा विषाणू सापडल्यामुळे पालिकेने आपली मोहीम कडक केली आहे. महापालिकेच्या ‘के -पश्चिम’ विभाग कार्यालयाने अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम या परिसरात सर्वाधिक कारवाई के ली. या ठिकाणी ५४ हजारांहून अधिक नागरिकांकडून ११ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याखालोखाल कुर्ला परिसरात ‘एल’ विभागाने ४७ हजार ६४७ जणांवर कारवाई करून ९ लाख ६९ हजारांचा दंड वसूल के ला. ‘के -पूर्व’मधील अंधेरी, जोगेश्वरी पूर्वमधून ४७ हजार ४७२ लोकांकडून ९ लाख ६३ हजारांचा दंड वसूल केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा