Advertisement

आपत्कालिन परिस्थितीत महापालिकेचे ‘सिंघल’ गायब


आपत्कालिन परिस्थितीत महापालिकेचे ‘सिंघल’ गायब
SHARES

मुंबईत मागील शनिवार ते सोमवार असे तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडावं अशी सूचना देत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व खातेप्रमुखांच्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्या रद्द केल्या होत्या. परंतु, दुसरीकडे मुंबई महापालिकेचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या सुट्टीची महापालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे.


मुंबईची दैना

अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते, उद्यान असे विभाग आहेत. खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना रस्त्यांवर उतरून हिंदमाता आणि हाजी अली येथील पम्पिंग स्टेशनच्या कामांची पाहणी करावी लागली होती. या २ दिवसांमध्ये झाडे उन्मळून पडून ६ ते ७ जण जखमी झाले असून एका मुलीचा बळी यात गेला. मानखुर्द येथे गटारात पडून दोन वर्षीय मुलाचा बळी गेला.


विजय सिंघल सुट्टीवर

विजय सिंघल यांच्याकडे जी खाती आहेत, त्या सर्व खात्यांमध्ये आपत्कालिन परिस्थिती निर्माण होऊन मुंबईत भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मात्र, खुद्द विजय सिंघल हे सुट्टीवर असून महापालिका आयुक्तांनी सर्वांच्या सुट्ट्या रद्द केल्या. परंतु, विजय सिंघल यांची सुट्टी रद्द का झाली नाही. ते सुट्टी रद्द करून सेवेत रुजू का झाले नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही याबाबत तीव्र चिंता व्यक्त करून मुंबईत आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली असताना, त्या खात्याचे अतिरिक्त आयुक्तच जर सुट्टीचा आनंद लुटत असतील तर यापेक्षा मुंबई महापालिकेचं दुर्देव नाही. यातून महापालिका प्रशासन आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्याबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येतं, असं म्हटलं आहे.



हेही वाचा-

तुंबलेल्या पाण्यातही भाजपाचं राजकारण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा