Advertisement

महापालिकेने मिलन सब वेजवळील मार्बलवाल्यांची मस्ती उतरवली


महापालिकेने मिलन सब वेजवळील मार्बलवाल्यांची मस्ती उतरवली
SHARES

विलेपार्ला येथील मिलन सब वेजवळील मार्गावर अतिक्रमण करणाऱ्या मार्बलवाल्यांची मस्ती अखेर महापालिकेने उतरवली आहे. मागील सात वर्षांपासून मार्बलच्या दुकानांनी अतिक्रमण करून वाढीव बांधकामे केल्यामुळे येथील दयालदास रोडवर मोठ्या प्रमाणात बॉटलनेक तयार होत होते. विमानतळाकडे जाणाऱ्या या मार्गावर या अतिक्रमणांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येथील सुमारे २४ मार्बलच्या दुकानांवर कारवाई करून हा बॉटलनेक मोकळा करण्यात आला आहे.



पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरून मिलन सब वे रस्ता आणि दयालदास रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या रस्त्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून २०१०मध्ये हाती घेण्यात आले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात मिलन सब वे ते श्रद्धानंद रोडपर्यंतचे काम हाती घेण्यात आले. या ठिकाणी होणारे उड्डाणपूल हे पूर्वी सरळ उतरणार होते. परंतु, मार्बलच्या दुकानांसाठी या उड्डाणपुलाचा आराखडा बदलून त्याचे विस्तारीकरण करण्यात आले होते.


बॉटलनेकमुळे वाहतूककोंडी

मात्र, मिलन सब वे जवळील सुमारे २४ मार्बलच्या दुकानांनी तब्बल ५० टक्के अतिक्रमण केले होते. या सर्व अतिक्रमणांवर के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करून वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या अतिक्रमणांमुळे पश्चिम द्रुतगति महामार्गावर जाणाऱ्या, तसेच दयालदास रोडवर एक प्रकारे बॉटलनेक तयार होऊन वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळेच यावर कारवाई करण्यात आली असून यामुळे ही वाहतूक कोंडी दूर होईल, असे सपकाळे यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा