जनजागृतीसाठी सहायक आयुक्तांनीच गायले गाणे!

  Mumbai
  जनजागृतीसाठी सहायक आयुक्तांनीच गायले गाणे!
  मुंबई  -  

  अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. या काळात नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई महापालिका गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. गणपतीच्या आगमनानंतर सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. अशात नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण विभागाने गाण्यांची एक सीडी तयार केली आहे. पालिकेच्या बी वॉर्डचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनीही यातील एका गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे.


  काय आहे या सीडीत?

  या सीडीत स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे 'सवाल जवाब', पोवाडा, कदम रॅप अशा गाण्यांचा समावेश आहे. गणेशोत्सव काळात काही सार्वजनिक मंडळ धांगडधिंगा करणारी गाणी लावतात. ती गाणी न लावता 'सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छतेविषयी प्रबोधन करणारी पालिका विभागाने तयार केलेली सीडी लावावी', यासाठी पालिका स्तरावर मंडळांना आवाहन करण्यात येणार आहे.

  बी पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय शिरुरकर यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरुप एफ दक्षिण पालिकेच्या घनकचरा विभागाचे अभियंता परशुराम खुराडे यांनी दिले.

  या सीडीतील गाणी अमीर हडकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर कॉमेडी अभिनेता अरुण कदम यांनी सीडीचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या सीडीतील एका गाण्याला पालिका सहाय्यक आयुक्त उदय शिरुरकर यांनी आवाज दिला आहे.


  पालिकेच्या 24 वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांना ही गाण्याची सीडी मोफत देण्यात येणार आहे. ही सीडी पालिका विभागाकडून घेऊन ती आपापल्या विभागात वाजवण्यासाठी मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी.


  - परशुराम खुराडे, अभियंता, घनकचरा विभाग, एफ दक्षिण 
  हेही वाचा - 

  गणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या

  गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या 'या' स्पेशल गाड्या!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.