Advertisement

धक्कादायक! वांद्र्यातील कोरोनाला आळा घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचाच कोरोनाने मृत्यू

वांद्रे पूर्वेकडील भागात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा शनिवारी कोराेनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. खैरनार यांच्या निधानाने महापालिकेला फार मोठा धक्का बसला आहे.

धक्कादायक! वांद्र्यातील कोरोनाला आळा घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचाच कोरोनाने मृत्यू
SHARES

वांद्रे पूर्वेकडील भागात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा शनिवारी कोराेनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. खैरनार यांच्या निधानाने महापालिकेला फार मोठा धक्का बसला आहे.

याआधी महापालिका उपायुक्त शिरीष दिक्षित यांचं देखील कोरोनामुळे निधन झालं होतं. तर महापालिकेचे १०० हून कर्मचारी आतापर्यंत कोरोनामुळे दगावले आहेत. 

५७ वर्षांचे अशोक खैरनार मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. खैरनार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत एच पूर्व विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे.

एच पूर्व विभागात वांद्रे पूर्वेकडील भाग येतो. या विभागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री देखील येतं. मुंबईतील विकसनशील भाग म्हणूनही हा परिसर ओळखला जातो. या परिसरातील लोकसंख्या ६ लाखांहून अधिक असून ७८ टक्के परिसर झोपडपट्ट्यांनी व्यापलेला आहे. बेहरामपाडा, गोळीबार, शास्त्रीनगर, भरतनगर, वाकोला इ परिसर दाटीवाटीची वस्ती असलेले आहेत. त्यामुळेच येथील कोरोना रुग्णांची संख्या ३७०० च्या पलिकडे जाऊन पोहोचली. 

 या भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यावर ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन, स्क्रिनिंग करून रुग्णांना शोधून काढण्यात आलं आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. परिणामी वांद्रे पूर्वेकडील भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळू कमी होऊ लागला. २८०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण दुपटीचा कालावधी १३४ दिवसांवर आला. या मोहिमेचं नेतृत्व अशोक खैरनार यांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं कौतुक होत असतानाच खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा