मुंबई - गोवंडी, शिवाजीनगर इथल्या 60 फुटी रस्त्यावरील अतिक्रमण अखेर महापालिकेने हटवली आहेत. त्यामुळे आता हा रस्ता मोकळा झाला आहे. अतिक्रमण हटवल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागला आहे. या रस्त्यावर 10 वर्षांपूर्वी 82 झोपड्यांचे अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणांनामुळे शिवाजी नगर बस स्थानकावरून 90 फुटी रस्त्याकडे जाण्यास मोठा अडसर निर्माण व्हायचा. त्यामुळे एम-पूर्व विभागाने दोन दिवस धडक कारवाई करत सर्व अतिक्रमणे हटवली. पालिकेच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे