Advertisement

आयकराच्या अचूक कारभारासाठी टीडीएसमॅनचं सॉफ्टवेअर


आयकराच्या अचूक कारभारासाठी टीडीएसमॅनचं सॉफ्टवेअर
SHARES

मुंबई महापालिकेच्या कामगारांच्या पगारातून आयकराची रक्कम कापून घेतल्यानंतरही ७४ कोटींची रक्कम वेळीच भरु न शकल्यामुळे आयकर विभागानं महापालिकेचं बँक खातंच सिल केलं होतं. त्यामुळे महापालिकेच्या अब्रुची लक्तरेच वेशीवर टांगली गेली. त्यामुळे या चुकीतून धडा घेत आता महापालिकेनं आयकराचा कारभार सहजपणे करता यावा, यासाठी आता टीडीएसमॅन हे सॉफ्टवेअरच विकत घेतलंय.

महापालिकेच्या कामगारांचं तसंच निवृत्तीवेतन धारकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विभागाचं आणि खात्यांचं आस्थापना विभाग त्यांच्या मासिक वेतनातून तसेच निवृत्तीवेतनातून आयकराची रक्कम वसूल करते. ही वसूल केलेली रक्कम निश्चित केलेल्या वेळेत आयकर खात्यात भरण्याचं कामकाज हे महापालिकेच्या आयकर विभागाच्या माध्यमातून केलं जातं. परंतु वसूल केलेली आयकराची रक्कम त्याच आर्थिक वर्षांत आयकर खात्याकडे जमा होणं आवश्यक असतं. पण आजी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या आयकरविषयक गुंतवणुकीची नोंद संबंधित आस्थापना कर्मचाऱ्यांनी कार्यप्रणालीत योग्यप्रकारे केली नसल्यामुळे तसंच काही कार्यप्रणालीत तांत्रिक त्रुटींमुळेच आयकर थकबाकी मोठ्याप्रमाणात राहिली होती. यापूर्वी ७४ कोटींची थकीत रक्कम राहिल्यामुळे महापालिकेचं बँक खातंच आयकर विभागानं सिल केलं होतं. याप्रकरणी तत्कालिन अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.

मात्र अशाप्रकारच्या त्रुटी टाळून भविष्यात आयकर वसुली योग्यप्रकारे होण्याकरता तसेच आयकर विषयक कामे सुलभपणे तथा जलदगतीनं करण्यासाठी मानव संसाधन विभागानं अर्थात एचआर विभागानं सॉफ्टवेअर घेण्याची सुचना केली होती. त्यानुसार महापालिकेनं पीडीएस ईन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची संलग्न कंपनी असलेल्या जया सॉफ्टवेअर कंपनी यांनी विकसित केलेल्या टीडीएसमॅन ही कार्यप्रणाली विकत घेतली आहे. या नव्या सॉफ्टवेअरच्या कार्यप्रणालीला एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे. या टीडीएसमॅन या सॉफ्टवेअरच्या कार्यप्रणालीत कर्मचाऱ्याच्या आयकराची अचूक नोंद ठेवली जाते. यामध्ये टीडीएस कमी कापल्यास किंवा त्यांचा किती कापला जावा याची माहितीसह आयकराला कितीचा भरणा करायचा आहे याची सर्व माहिती उपलब्ध होते. या कार्यप्रणालीमुळे यापूर्वी झालेली चूक टाळता येवू शकते, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.



हेही वाचा

बाळासाहेबांचं स्मारक होणार भूमिगत


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा