Advertisement

बाळासाहेबांचं स्मारक होणार भूमिगत


बाळासाहेबांचं स्मारक होणार भूमिगत
SHARES

सध्याच्या महापौर बंगल्याला हात न लावता शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बंगल्याच्या तळघरात अर्थात भूमिगत करण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने नुकतीच भूमिगत स्मारकाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.


प्रस्तावाला मंजुरी

१९२८ साली बांधण्यात आलेला महापौर बंगला ऐतिहासिक वास्तूच्या श्रेणीत येतो. महापौर बंगल्याला पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे या वास्तूला धक्का लागू नये म्हणून स्मारक भूमिगत बनवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने बंगल्याला भेट देत प्रस्तावाला मंजुरी दिली.


उद्धव ठाकरे यांचा पुढाकार

या मंजुरीमुळे ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड न होता तसंच बंगल्याच्या परिसरातील झाडांची कत्तल न करता इथं बाळासाहेबांचं स्मारक बनवता येणार आहे. या वास्तूचे जतन करुन त्याचं पर्यटनात रुपांतर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.


जागेचा अडसर दूर

महापौर बंगल्याची वास्तू २३०० चौ.फूट क्षेत्रफळात पसरलेली आहे. ही जागा लहान असल्याने बाळासाहेबांचं स्मारक बांधण्यासाठी जागा अपुरी ठरत होती. या उलट बंगल्याचा भूमिगत परिसर तब्बल ९००० चौ.फू इतक्या क्षेत्रफळावर पसरलेला आहे. या जागेचा योग्य रितीने वापर करून बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल.



हेही वाचा-

महापौरांना निवासस्थान न मिळाल्यास... शिवसेना नगरसेवकांचा इशारा

महापौर निवासाची जागा ग्रीन झोनऐवजी आता निवासी पट्ट्यात, पण इथंच खरी गोची



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा