पालिका त्या कंत्राटदारांवर मेहरबान का?

 Pali Hill
पालिका त्या कंत्राटदारांवर मेहरबान का?

मुंबई - निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची कामे करत मुंबई महानगर पालिकेला खड्ड्यात घालणा-या 16 कंत्राटदारांवर पालिका पुन्हा मेहरबान झाल्याची माहिती समोर आलीय. या 16 कंत्राटदारांनी रस्त्यांच्या कामांतर्गत पालिकेला 572 कोटींचा गंडा घातल्याचे रस्ते घोटाळ्यासंदर्भातील उच्च स्तरीय चौकशी समितीनं नमुद केलंय. असं असतानाही पालिकेने या कंत्राटदारांना पुन्हा रस्त्याचे कंत्राट दिल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

पालिकेकडून 305 रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे पूर्ण करत मतदारांना खुश करण्यासाठी रस्त्यांची कामे घाईत सुरू करण्यात आली असून त्यासाठीच या कंत्राटदारांना ही कामे दिल्याचीही चर्चा पालिकेत आहे. तर घोटाळेबहाद्दर कंत्राटदारच रस्त्यांची कामे करणार असल्यानं पुन्हा मुंबईकरांची वाट बिकट होणार हे मात्र नक्की.

Loading Comments