Advertisement

BMC Budget 2023-24 : भांडुप आणि कांदिवलीमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स उभारणार

दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

BMC Budget 2023-24 : भांडुप आणि कांदिवलीमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स उभारणार
SHARES

मुंबईतील भांडुप आणि कांदिवली येथे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालये उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या दोन्ही रुग्णालयांवर काम सुरू झाल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. यासोबतच ही दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या बजेटसाठी पालिकेने लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. लोकांनी बीएमसीला 900 हून अधिक सूचना दिल्या. (Super specialist hospitals to be built in Bhandup and Kandivali)

एअर प्युरिफायर ऑफर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) वाढत्या प्रदूषण पातळीला तोंड देण्यासाठी शहरात एअर प्युरिफायर बसवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या 2023-24 च्या बजेटमध्ये (BMC बजेट 2023) एअर प्युरिफायर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी 2023-24 महानगरपालिका अर्थसंकल्पात (BMC BUDGET 2023) 5 एअर प्युरिफायर प्रस्तावित केले आहेत. दहिसर टोल गेट, मुलुंड चेक गेट, मानखुर्द, कला नगर आणि हाजी अली जंक्शन अशा गजबजलेल्या भागात पाच एअर प्युरिफायर प्रस्तावित आहेत.हेही वाचा

मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पात टॅक्सबाबात पालिकेचा मोठा निर्णय

BMC budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार">BMC Budget 2023-24: मुंबईतल्या 'या' 5 गजबजलेल्या भागात एअर प्युरिफायर उभारणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा