Advertisement

खुशखबर! मुंबईत शनिवारपासून पाणीकपात नाही

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचा पाणी प्रश्न निकाली लागला असून, १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

खुशखबर! मुंबईत शनिवारपासून पाणीकपात नाही
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचा पाणी प्रश्न निकाली लागला असून, १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा पाठीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळं १५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली पाणीकपात महापालिकेनं मागे घेतली आहे. शनिवार २० जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.

९ टक्के कमी

गेल्या वर्षी पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबर २०१८ रोजी तलावांमधील पाण्याचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव पूर्ण भरलेले असताना वापरण्यायोग्य पाण्याचा उपलब्ध साठा एकूण साठ्यापेक्षा ९ टक्के कमी होता. त्यामुळं १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळं मुंबईकरांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता.

पाणी साठ्याचा आढावा

नुकताच १५ जुलै २०१९ रोजी तलाव क्षेत्रांतील पाणी साठ्याचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यावेळी एकूण पाणीसाठ्याच्या ४८ टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याचं आढळून आलं. जून आणि जुलैमध्ये पडलेल्या समाधानकारक पाऊसामुळं हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणं, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत सर्व तलाव पूर्ण भरतील अशी शक्यता आहे.हेही वाचा -

काय रे, अलिबागवरून आलायस का? डायलाॅगवरील बंदीची याचिका फेटाळली

गणपती उत्सवासाठी एसटी सज्ज २२०० जादा बसेस सोडणारRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा