Advertisement

गणपती उत्सवासाठी एसटी सज्ज २२०० जादा बसेस सोडणार

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून जादा बसगाड्य सोडण्यात येतात. त्याचप्रमाणं, यंदा प्रवाशांची मागणी लक्षात घेत एसटी महामंडळानं तब्बल २ हजार २०० जादा बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

गणपती उत्सवासाठी एसटी सज्ज २२०० जादा बसेस सोडणार
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून जादा बसगाड्य सोडण्यात येतात. त्याचप्रमाणं, यंदा प्रवाशांची मागणी लक्षात घेत एसटी महामंडळानं तब्बल २ हजार २०० जादा बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या २७ जुलैपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षापासून  चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचं देखील आरक्षण एकाचवेळी करता येणार आहे.  

गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे.  एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नातं आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीनं जादा बसेसची सोय केली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

२० जुलैपासून ग्रुप बुकींग

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटानं बस आरक्षित करतात. मागील कित्येक वर्ष एसटी या प्रवाशांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणं सोडत आली आहे. अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) २० जुलै पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

जादा बसेसची सोय

मुंबई आणि उपनगरातील १४ बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसंच, परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठीक-ठिकाणी वाहन दुरुस्ती पथकं तैनात करण्यात येणार आहेत. सोबतच प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.हेही वाचा -

वाहन असले तरी रेशनकार्ड रद्द होणार नाही

अंडरवर्ल्डमध्ये व्हाॅटस अॅप रेकाँर्डिंगचा ट्रेडRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा