Advertisement

वाहन असले तरी रेशनकार्ड रद्द होणार नाही

दुचाकी, चारचाकी वाहन असलेल्यांचे रेशनकार्ड रद्द होणार नसल्याचा खुलासा सरकारने एक परिपत्रक काढून गेला आहे.

वाहन असले तरी रेशनकार्ड रद्द होणार नाही
SHARES

सरकारकडून काढण्यात आलेल्या एका परिपत्रकामुळे ज्या रेशनकार्डधारकांकडे  दुचाकी, चारचाकी वाहन असेल त्यांचं रेशनकार्ड रद्द होईल अशी भिती निर्माण झाली होती. मात्र, दुचाकी, चारचाकी वाहन असलेल्यांचे रेशनकार्ड रद्द होणार नसल्याचा खुलासा सरकारने एक परिपत्रक काढून गेला आहे. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने तसं परिपत्रक काढून लोकांच्या मनातील भिती दूर केली आहे. 

सरकारने १३ जून रोजी एक परिपत्रक काढलं होतं. या परिपत्रकात १९९९ च्या शासन निर्णयाचा हवाला देऊन, दुचाकी-चारचाकी असेल तर रेशनकार्ड मिळणार नाही या अटीसह अजून काही अटी घातल्या होत्या.  या परिपत्रकात जमिनीच्या मालकीबाबत महसूल विभागाशी समन्वय ठेवून रेशनकार्डधारकांच्या कागदपत्रांची छाननी करावी अशा सूचना होत्या. यामुळे दुचाकी-चारचाकीधारक तसेच ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती. पण सरकारने परिपत्रक काढून ज्या रेशनकार्डधारकांकडे दुचाकी, चारचाकी तसेच जमिनीची मालकी असल्यास कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे म्हटलं आहे. 



हेही वाचा -

दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेची योजना

जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा