दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेची योजना

या योजनेत स्थानकांदरम्यान गस्त घालणे, झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करणं, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती इत्यादींचा समावेश आहे.

दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेची योजना
SHARES

मुंबईत लोकलवर दगडफेकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावरील लोकलवर झालेल्या दगडफेकीत ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळं या घटनांवर आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलानं विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेत स्थानकांदरम्यान गस्त घालणे, झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करणं, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती इत्यादींचा समावेश आहे.

सीसीटीव्ही कार्यान्वित

मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर स्थानकात दगडफेकीच्या घटना जास्त होत असून या ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणं, अशा घडणाऱ्या बाकीच्या स्थानकांवरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सोबतच कांजुरमार्ग-विक्रोळी-घाटकोपर आणि घाटकोपर-विद्याविहार मार्गावर १६ आणि दादर-कुर्ला-विद्याविहार मार्गावर २० रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची नियुक्ती करून त्यांच्यावर गस्त घालण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

साध्या वेशातील पोलीस

रेल्वे सुरक्षा बलांसह रेल्वे पोलिस आणि शहर पोलिस समन्वय साधून साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्यांना देखील देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. त्यामुळं आता लोकलवरील दगडफेकीच्या घटनांना आळा बसणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

महापालिका मुंबईत बसवणार 'वॉटर एटीएम'

मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करा- योगेश सागरRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा