Advertisement

पश्चिम व पूर्व उपनगरातील रस्त्यांसाठी 42 कोटींचा खर्च

गेल्यावर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला होता. यासाठी तीन हजार मेट्रिक टन मास्टिक डांबरचा वापर करण्यात आला होता.

पश्चिम व पूर्व उपनगरातील रस्त्यांसाठी 42 कोटींचा खर्च
SHARES

यंदा पावसाळ्यात मुंबईच्या (mumbai)  रस्त्यांवरील खड्डे (potholes) बुजवण्यासाठी दोन ते तीन हजार मेट्रिक टन मास्टिक डांबरचा वापर करण्यात येणार आहे.

शहर व दोन्ही उपनगरातील खड्डे भरण्यासाठी 42 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यापूर्वी, पावसाळादरम्यान व पावसाळ्यानंतर होणार आहे.

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिका (bmc) दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कोडे न सुटणारे आहे.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (brihanmumbai municipal corporation)  मुंबईतील सुमारे 2,118 कि.मी. रस्त्यांच्या जाळ्यांचे जबाबदारीने देखभाल व परिरक्षण केले जाते.

तसेच त्यामुळे पुढील वर्ष-दोन वर्षांत मुंबईतील रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे होतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी यंदा 42 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला होता. यासाठी तीन हजार मेट्रिक टन मास्टिक डांबरचा वापर करण्यात आला होता.

मात्र, यंदा खड्डे बुजवण्याच्या खर्चात बचत झाली असून मास्टिकही दोन हजार मेट्रिक टन वापरण्यात येणार आहे.

मुंबईतील मोठ्या रस्त्यावर खड्डे पडल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंत्राटदारांच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचे काम केले जाते.

मात्र, मुंबई महापालिकेच्या विभाग स्तरावर सेंट्रल एजन्सीमार्फत खड्डे बुजवण्यात येतात, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांचे पाणी जपून वापरण्याचे निर्देश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा