Advertisement

वरळीतील युनियन रेस्टॉरंट-पबचा परवाना रद्द

या युनियन रेस्टॉरंट-पबविरूद्ध महापालिकेच्या जी दक्षिण विभागाकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

वरळीतील युनियन रेस्टॉरंट-पबचा परवाना रद्द
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला नष्ट करण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. कोणत्याही ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. परंतु, वरळीच्या कमला मील परिसरात असलेल्या युनियन रेस्टॉरंट-पबमध्ये सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवणात आले. याप्रकरणी या युनियन रेस्टॉरंट-पबविरूद्ध महापालिकेच्या जी दक्षिण विभागाकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसंच, ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कोविड नियमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित पबला कारणे दाखवा नोटीस बजावली अूसन परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला आहे. युनियन रेस्टॉरंट आणि पबमध्ये महापालिकेनं जाहीर केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक जमले होते. डान्स करतानाही सामाजिक अंतर पाळले जात नव्हते. सध्या क्षमतेच्या ५० टक्केच ग्राहकांना रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये परवानगी आहे. मात्र, या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक जमल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान लक्षात आले. त्याची गंभीर दखल घेत महापालिकेनें या रेस्टॉरंट-पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द केला आहे.

त्याशिवाय, संबंधित परिसरातील सर्व रेस्टॉरंट-पबना कोरोनाचे नियम पाळा नाहीतर कारवाई करू, गुन्हा दाखल करू अशा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यासाठी पालिका आणि पोलिसांचे एक संयुक्त गस्ती पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दररोज परिसरात सर्व रेस्टॉरंट-पबची पाहणी करणार आहे.

सरकार आणि महापालिकेनं काही निर्बंध घालून लोकांसाठी सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, आता लोकांना या निर्बंधांचं भान राहिल्याचं दिसत नाही. त्यामुळं रेस्टॉरंट-पबमध्ये गर्दी झाली तर मालकाप्रमाणं तिथं जमणाऱ्यांविरोधातही आता कारवाई व्हायला हवी, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा