Advertisement

मास्क न घालणाऱ्यांकडून ४ कोटींचा दंड वसूल, बीएमसीची कारवाई

अनेक नागरिक मास्क घालत नसल्याचं आढळून आलं आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.

मास्क न घालणाऱ्यांकडून ४ कोटींचा दंड वसूल, बीएमसीची कारवाई
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं अनिवार्य आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क घालत नसल्याचं आढळून आलं आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या २ लाख २६ हजारांविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ४ कोटी ७९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र तरीही सार्वजनिक ठिकाणी वारताना मास्क घालणं बंधनकारक आहे. मात्र, काही बेजबाबदार नागरिक याकडं दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्गही वाढण्याचा धोका आहे.   अद्यापही संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करत नसल्याचं दिसून येत आहे. सध्या दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत जात आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांमुळे संसर्ग फैलावाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. 

 पालिकेने ९ एप्रिलपासून मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीच्या काळात दंडाची रक्कम १ हजार रूपये इतकी होती. परंतु आता ती २०० रूपये करण्यात आली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे विविध स्तरावर कार्यवाहीदेखील सुरू आहे. ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी यापूर्वी दिले होते.

या अंतर्गत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश देण्यात आले होते.



हेही वाचा -

वाढीव वीजबिलात २ टक्के सूट देण्याचा बेस्टच्या निर्णय

महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करण्यावर बंदी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा