Advertisement

सरप्राईज व्हिजीट देण्याचे सांगून अायुक्त गायब


सरप्राईज व्हिजीट देण्याचे सांगून अायुक्त गायब
SHARES

मुंबईतील विविध ठिकाणी रस्त्यांची तसेच पदपथांसह अनेक विकास कामं सुरु आहेत. कामांसाठी खणलेले खड्डे, चर बुजवण्याचे तसेच अर्धवट काम पू्र्ण करण्याचे अाणि  डेब्रीज, पेव्हरब्लॉक पडलेले असतील तर त्याची त्वरीत पाहणी करून सोमवारपर्यंत त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले होते.  उपायुक्त व सहायक आयुक्तांनी केलेल्या कामांची पाहणी मंगळवारी ५ जूनला  अायुक्त सरप्राईज व्हिजीट देऊन करणार होते. मात्र, त्यानंतर आयुक्त बुधवार उलटले तरी रस्त्यांवर दिसले नाहीत. त्यामुळे या सरप्राईज व्हिजिटचे काय झालं असा प्रश्न विचारला जात आहे.



रविवारची सुट्टी रद्द


महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यांची व पदपथांची कामं सुरु अाहेत. या ठिकाणी डांबर, बॅरिकेड्स अादी पडलेले साहित्य तात्काळ योग्य ठिकाणी हलविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते.  यासाठी रविवार ३ जून रोजी सर्व परिमंडळीय उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या सुट्टया रद्द  केल्या. त्यानुसार रविवारी सर्व सहायक आयुक्त व उपायुक्तांनी आपापला भाग पिंजून जिथे अशाप्रकारचं साहित्य पडलेलं होतं, ते हटवलं.

मात्र, या उपायुक्त व सहायक आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार आपल्या भागातील साहित्य हटवले किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी खुद्द महापालिका आयुक्त अजोय मेहता हे मंगळवारी ५ जून रोजी महापालिकेच्या २४ विभागांपैकी काही विभागांमध्ये स्वतः अचानक पाहणी दौरा करतील, असे प्रसिध्दी पत्रकांत म्हटलं होतं. पण मंगळवार आणि बुधवार उजाडला तरी आयुक्त काही रस्त्यांवर पाहणी करताना दिसलेच नाहीत.  आयुक्त  ७ जूनपर्यंत सुट्टीवर आहेत. परंतू आयुक्त सुट्टीवर असतानाही त्यांच्या प्रसिध्दीप्रमुखांनी मंगळवारी ते पाहणी करतील, असे जाहीर करून टाकले. त्यामुळे आयुक्तांची मोठी पंचाईत झाली.



हेही वाचा - 

महापालिका आयुक्त की मुख्यमंत्र्यांचे चपराशी? महापौरांची थेट नाराजी

पालिकेव्यतिरिक्त रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी सरकारचीच - महापौर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा