Advertisement

पालिकेव्यतिरिक्त रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी सरकारचीच - महापौर


पालिकेव्यतिरिक्त रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी सरकारचीच - महापौर
SHARES

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांबाबत महापालिका दक्ष आहे. महापालिका अभियंत्यांनी तयार केलेले कोल्डमिक्स खड्डयांमध्ये टाकून ते बुजवले जातील. रस्त्यांची झालेली आणि सुरु असलेली कामे पाहता महापालिकेच्या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. मात्र, महापालिकेव्यतिरिक्त इतर प्राधिकरणांच्या जागेवर खड्डे पडणार नाहीत, याची हमी मी देऊ शकत नाही. अशा रस्त्यांवर खड्डे पडल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं आहे.


खड्डयांचं प्रमाण कमी

मुंबईतील रस्त्यांवर दरवर्षी निर्माण होणारी खड्डयांची समस्या जुनीच आहे. परंतू मागील दोन वर्षांपासून अत्यंत खराब रस्ते तसेच त्याखालोखाल खराब रस्ते अशाप्रकारे जुन्या रस्त्यांची कामं हाती घेण्यात येतात. त्यामुळं वारंवार खड्डे पडत असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानं प्रत्येक वर्षी पडणाऱ्या खड्डयांचं प्रमाण कमी होत आहे.


कोल्डमिक्सने खड्डे बुजवणार

महापालिकेनं यंदा अडीच हजार मेट्रीक टन कोल्डमिक्स तयार केलं आहे. अत्यंत स्वस्त दरात तयार केलेल्या या कोल्डमिक्सचा वापर करत रस्त्यांवरील खड्डे बुजवले जाणार आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूकही केली आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात खड्डे पडणार नाहीत.

महापालिका खड्डयांबाबत दक्ष असून जरी खड्डा पडला तरी त्याचा त्रास मुंबईकरांना होणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केलं. मात्र, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा,पीडब्ल्यूडी, मुंबई बंदर आदी भागातील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डयांची जबाबदारी ही महापालिकेची नसून ती राज्य सरकारची तथा त्या त्या प्राधिकरणांची व मंडळांची असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर न पडणाऱ्या खड्डयांसाठी कुणी महापालिकेला बदनाम करू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा - 

महापालिकेची खड्डयांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन

महापालिकेच्या विधी विभागाचे ब्रेनवॉश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा