Advertisement

राजेंद्र लोखंडे यांच्यासह आपत्कालिन प्रशिक्षण देणाऱ्यांचा सन्मान


राजेंद्र लोखंडे यांच्यासह आपत्कालिन प्रशिक्षण देणाऱ्यांचा सन्मान
SHARES

मागील ३ वर्षांत सुमारे २५ हजार व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणाऱ्या पथकातील महापालिका कर्मचारी राजेंद्र रामचंद्र लोखंडे, प्रविण शंकर ब्रम्हदंडे व भरतकुमार सुधाकर फुणगे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात'सप्टेंबर-२०१८' करिता 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफिसर ऑफ द मंथ' या बहुमानाने सन्मानित करून महापालिका आयुक्तांच्या हस्ते या सर्वाँचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आपत्कालिन विभागाच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी राजेंद्र लोखंडे यांनाही महिन्याच्या मानकरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळेच लोखंडे दाम्पत्यानं हा पुरस्कार मिळवून महापालिकेच्या प्रामाणिक सेवेचं प्रमाणपत्र मिळवलंय.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या मासिक आढावा सभेमध्ये या सर्वांचा शाल, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना विविध आपत्तींचा मुकाबला अधिकाधिक प्रभावीपणे करता यावा, यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नियमितपणे देण्यात येतं. गेल्या ३ वर्षांत दोनशे प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सुमारे २५ हजार व्यक्तींना आपत्कालीन व्यवस्थापनाचे 'थेट प्रशिक्षण' देणाऱ्या प्रशिक्षकांच्या चमूचा प्रातिनिधीक सन्मान बैठकी दरम्यान करण्यात आला.


विद्यार्थिनीचा सन्मान

काही दिवसांपूर्वी हिंदमाता परिसरातील एका इमारतीमध्ये आग लागण्याची एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेदरम्यान झेन सदावर्ते या शालेय विद्यार्थीनीने प्रसंगावधान राखत एका प्रशिक्षणादरम्यान तिच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीचा सदुपयोग केला. यात प्रामुख्याने आगीच्या दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना सुती कापड ओले करुन नाका तोंडावर धरण्याच्या उपायाचा समावेश होता. या एका छोट्याश्या पण अत्यंत महत्त्वाच्या बाबीमुळे त्या दिवशी अनेकांचे प्राण वाचले.



या घटनेने आपत्कालीन व्यवस्थापनाच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज अधोरेखित झाली. सदर विद्यार्थिनीला तिच्या ज्या शिक्षकांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं होतं, त्या शिक्षकांना महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील पर्यवेक्षक राजेंद्र रामचंद्र लोखंडे यांनी प्रशिक्षण दिलं होतं. या सर्व बाबी लक्षात घेऊन जेन सदावर्ते या विद्यार्थिनीला व तिच्या शाळेच्या प्राचार्यांनाही आजच्या बैठकीदरम्यान विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी तिचे पालकही उपस्थित होते.


सुपे यांनाही पुरस्कार

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांना वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या निमित्ताने आजच्या मासिक आढावा बैठकीच्या सुरुवातीला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी डॉ.सुपे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब ज-हाड, उपायुक्त रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. तसेच जेन सदावर्ते या विद्यार्थिनीच्या सत्कार प्रसंगी 'डॉन बॉस्को इंटरनॅशल'शाळेच्या प्राचार्या मीना साल्ढान्हा यादेखील विशेष उपस्थित होत्या.



हेही वाचा-

ठाण्यातील झाडांना बसवलंय लोखंडी कवच!

डाव्या विचारवंतांच्या अटकेचा निषेध; डाव्या, पुरोगामी संघटनांचा मोर्चा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा