'आता कंत्राटदारांची खैर नाही'

 Pali Hill
'आता कंत्राटदारांची खैर नाही'

मुंबई - खड्ड्यांवरून कित्येक दिवस पालिका आयुक्तांना टार्गेट करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी क्लीनबोल्ड केलं. बुधवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते. यापुढे मुंबईचे रस्ते चकाचक, खड्डेमुक्त असतील, असा दावा आयुक्तांनी केला. तसंच आता कंत्राटदारांच्या नाड्या आवळण्याचे आदेशही आयुक्तांनी दिलेत. एखादा कंत्राटदार खड्डे बुजवत नसेल तर त्याची वाट पालिका पाहणार नाही. पालिका स्वत: ते खड्डे बुजवेल. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला जो खर्च येईल, तो कंत्राटदाराच्या बकगरंटीतून वसूल करण्यात येईल. शिवाय त्या कंत्राटदाराची बिलंही अडवली जातील.

पालिका अधिकाऱ्यांनाही तंबी

खड्डे बुजवले न गेल्यास वा रस्त्यांचे काम दर्जाहिन झाल्यास त्यासाठी अभियंता आणि अधिकारीच जबाबदार राहणार, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. कामात हलगर्जी करणाऱ्या अभियंता आणि अधिकाऱ्यांविरोधातही यापुढे कारवाई होणार अशी तंबीही आयुक्तांना दिली.

Loading Comments