Advertisement

प्रत्येकाला वैद्यकीय सुविधा देण्यास आम्ही बांधील, पालिका आयुक्तांचं आश्वासन

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात ‘डॅशबोर्ड’ सुविधा सुरू करण्यात आली असून अर्ध्या तासाने रुग्णालयांमधील खाटांबाबतची माहिती मिळत आहे. असं चहल यांनी सांगितलं.

प्रत्येकाला वैद्यकीय सुविधा देण्यास आम्ही बांधील, पालिका आयुक्तांचं आश्वासन
SHARES

मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधेतही वाढ केली जात आहे. प्रत्येकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास आम्ही बांधील आहोत, असं आश्वासन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलं आहे.

आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी आयुक्त म्हणाले की, कोरोना रुग्णांसाठी खाटा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध करण्याबाबत मुंबईतील ३३ मोठय़ा रुग्णालयांच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. आता या खासगी रुग्णालयांमध्ये सरकारने निश्चित केलेल्या दरात उपचार घेणे शक्य होईल. पालिका रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण दाखल आहेत. खाटा तात्काळ उपलब्ध व्हाव्या यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात ‘डॅशबोर्ड’ सुविधा सुरू करण्यात आली असून अर्ध्या तासाने रुग्णालयांमधील खाटांबाबतची माहिती मिळत आहे.  १९१६ या आपत्कालीन क्रमांकाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असंही चहल यांनी सांगितलं.

जूनअखेरपर्यंत कोरोना रुग्ण आणि संशयित रुग्णांसाठी खाटांची क्षमता दीड हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे. आतापर्यंत पावणेदोन लाख व्यक्तींची करोनाविषयक चाचणी झाली असून ४२ लाख संशयितांची तपासणी झाल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.  प्रत्येक रुग्णालयात वॉर रूम तयार करून प्रत्येक खाटेला दिलेल्या युनिक आयडीद्वारे लक्ष ठेवणार आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दर ७.६ वरून ३.२ टक्क्य़ांपर्यंत कमी झाल्याचंही आयुक्तांनी सांगितलं. 



हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णालयाची मागणी

राज्यात १ व २ जूनला राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा