Advertisement

रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चेनंतरच निर्णय, BMC आयुक्तांचं दानवेंना उत्तर

कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चेनंतरच निर्णय, BMC आयुक्तांचं दानवेंना उत्तर
SHARES

कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. चहल यांच्या माहितीतून एकप्रकारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर देण्यात आलं आहे.

या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलताना इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं की, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल लाहोटी यांच्यासोबत गुरूवारी माझ्या कक्षात या विषयी तासभर चर्चा झाली. मुंबईची लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, असं त्यांनी मला सुचवलं. त्यासाठी क्यू आर कोड, मासिक पास आदी पर्यायांवर रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच हे मुद्दे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विचारार्थ पाठवले होते. जेणेकरून या पर्यायांच्या आधारे लोकल ट्रेन सुरू करायची अथवा नाही, यावर त्यांना निर्णय घेता येईल. सर्वांना विश्वासात घेऊनच आपण ही पावलं उचलत आहोत.

हेही वाचा- रेल्वे काय भाजपची नोकर आहे का?, संजय राऊत रावसाहेब दानवेंवर संतापले

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच रेल्वे प्रवासाची मुभा असणार आहे. लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच या प्रवाशांना क्यू आर कोड देण्यात येईल. क्यू आर कोडच्या आधारे पास काढूनच पात्र प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. यासाठी राज्य सरकारच्या अॅपचा वापर करता येईल. मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासीही या अॅपचा वापर करु शकतील. लोकल प्रवासासाठी यंत्रणा उभारण्याची जबाबदारी मुंबई महापालिका घेणार आहे, असंही इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

दरम्यान, अशी परवानगी देण्याआधी किंवा त्याबद्दलची घोषणा करण्याआधी राज्य सरकारने आमच्याशी चर्चा केली असती, तर समन्वयाने चांगला मार्ग काढता आला असता. रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांना दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळवून, त्यासाठी आवश्यक क्यू आर कोड घेऊनच पास मिळवता येणार आहे.  

परंतु हे क्यू आर कोड तपासण्याची यंत्रणा रेल्वे प्रशासनाकडे नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. त्यामुळे ही जबाबदारी राज्यानेच घेतली पाहिजे. राज्य सरकारने रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड आणि पास तपासण्याची यंत्रणा उभारावी. ओळख पटल्यानंतर रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी (raosaheb danve) राज्यावर ही जबाबदारी ढकलली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा