Advertisement

महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर- इक्बालसिंह चहल

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेचे (bmc) अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर- इक्बालसिंह चहल
SHARES

काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून मुंबईत अवघ्‍या काही तासांमध्‍ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे. अशावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेचे (bmc) अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल पुढं म्हणाले की, मुसळधार पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा इथं संरक्षक भिंत कोसळली. तसंच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्‍य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्‍यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्‍या स्‍थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्‍यात आलं आहे. 

पालकमंत्री आदित्‍य ठाकरे आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त अश्‍विनी भिडे यांच्‍यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्‍यक ते निर्देश दिल्‍याचंही चहल यांनी नमूद केलं.

‘इथं’ पाणी साचणार नाही

उपनगरीय रेल्‍वे रुळांवर साचणाऱ्या पावसाच्‍या पाण्‍याच्‍या अनुषंगाने इक्बालसिंह चहल म्‍हणाले की, माहूल येथील पर्जन्‍य जल उदंचन केंद्राचं बांधकाम लवकरच सुरु होणार असून हे केंद्र पूर्ण झाल्‍यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्‍यादी परिसरातील पाणी साचण्‍याचा प्रश्‍न निकाली निघेल.

मुंबईत पावसामुळे (mumbai rains) होणाऱ्या भूस्‍खलन घटना पाहता, संभाव्‍य ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचं बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्‍थलांतर व पुनर्वसन करण्‍याबाबतची कार्यवाही देखील करण्‍यात येत आहे, असंही आयुक्‍तांनी नमूद केलं.

हेही वाचा- पुढील ३ ते ४ तास ठाणे आणि रायगडसाठी महत्वाचे; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी म्‍हणाले की, मलेरिया, डेंगी आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होवू नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्‍याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्‍याचे सुरेश काकाणी यांनी नमूद केलं.

जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होत आहे

जोरदार पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात शिरून समस्या निर्माण झाल्यासंदर्भात  महानगरपालिकेचे उपआयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर म्‍हणाले की, भांडुप संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू कार्यान्‍व‍ित होत आहे. भांडुप येथील मुख्‍य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावत आहे. असं असले तरी उद्या एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्‍याची शक्‍यता आहे. सर्व यंत्रणा कार्यान्‍व‍ित होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती राठोर यांनी दिली.

हेही वाचा- मुंबई, कोकण किनारपट्टीसाठी पुढचे ५ दिवस आॅरेंज अलर्ट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा