पालिका आयुक्तांकडून खड्डेदुरुस्तीची पाहणी

 Pali Hill
पालिका आयुक्तांकडून खड्डेदुरुस्तीची पाहणी
पालिका आयुक्तांकडून खड्डेदुरुस्तीची पाहणी
See all

मुंबई - महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी सोमवारी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. आयुक्तांनी 17 आक्टोबरपर्यंत सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार रस्त्यांची आणि खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगितलं जातंय.

खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना लक्ष्य केलं होतं. आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचाचा इशाराही सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिला होता. पालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरावं आणि किती खड्डे आहेत हे पाहावं, अशी मागणीही सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. नगरसेवकांच्या रोषानंतर अखेर सोमवारी आयुक्तांना रस्त्यावर उतरून या कामाची सद्यस्थिती जाणून घ्यावी लागली.

Loading Comments