पालिकेकडून दुकानांवर कारवाई

 Sham Nagar
पालिकेकडून दुकानांवर कारवाई
पालिकेकडून दुकानांवर कारवाई
पालिकेकडून दुकानांवर कारवाई
पालिकेकडून दुकानांवर कारवाई
See all

जोगेश्वरी - येथील स्टेशन रोडवर असलेल्या दुकानांवर पालिकेच्या के/पूर्व विभागाने सोमवारी तोडक कारवाई केली. या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये संतापाचे वातावरण होते.

रोड कटिंगमध्ये रोड जाणार असल्याने दुकाने खाली करा आणि रोड पूर्ण झाला की तुम्ही परत आपल्या जागेवर दुकान बांधा, असे पालिका प्रशासनाने पाच दुकानदारांना नोटीस बजावून सांगितले होते. पण या सूचनेकडे दुर्लक्ष करत दुकानदारांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. अखेर पालिका प्रशासनाने या दुकानांचा वीजपुरवढा खंडित करून त्यांच्यावर तोडक कारवाई केली.

Loading Comments