Advertisement

मुंबईत रात्रीच्या वेळीही कोरोना लसीकरण

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण केलं जात आहे. लसीकरण हा एकच जालीम उपाय असल्यानं राज्यात सर्वत्र लसीकरणावर भर दिला जात आहे.

मुंबईत रात्रीच्या वेळीही कोरोना लसीकरण
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण केलं जात आहे. लसीकरण हा एकच जालीम उपाय असल्यानं राज्यात सर्वत्र लसीकरणावर भर दिला जात आहे. मुंबई महापालिका ही नागरिकांच्या लसीकरणासाठी अनेक प्रयत्न करत आहे. अशातच लसीकरणाचा वेग आणखी वाढावा यासाठी मुंबई महापालिकेने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईमध्ये सोमवारपासून संध्याकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येत आहे.

रात्रीची लसीकरण केंद्रं ही रेल्वे स्थानक परिसरात असणार आहे. त्यामुळं कष्टकरी, सामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सध्या ही लसीकरण केंद्रे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहेत.

ऑमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगानं मुंबईत रात्रीच्या वेळीचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात सध्या अशी किमान दोन लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा फायदा मुंबईमधील नोकरदार, कष्टकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कामावरून घरी परताना लस घेणे त्यांना शक्य होणार आहे.

अनेकजण नोकरी, रोजगारासाठी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीच्या वेळी घरी परतात. त्यामुळे अनेकांना लस घेणे शक्य होत नाही. त्याशिवाय, अनेकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी त्यांना वेळेअभावी, आवश्यकेतेनुसार लस घेण्याची वेळ मिळाली नाही. अशांना या रात्रीच्या लसीकरण केंद्राचा मोठा फायदा होणार आहे.

लसीकरण केंद्रे ही संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळं अनेकांना लस घेता येत नव्हती. आता रात्री ११ पर्यंत लसीकरण होणार असल्यामुळं लसीकरणाचा वेग वाढेल असा विश्वास महापालिका अधिकारी व्यक्त करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा