Advertisement

महिला सक्षमीकरणासाठी नगरसेवकांचा पुढाकार

काही नगरसेवकांनी आपल्या विभागांत महिला आधार केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर काहींनी उद्यानांमध्ये बाळाला दूध पाजता यावं यासाठी स्तनदा मातांसाठी फिडींग कॉर्नर बनवलं आहे. तसेच गरोदर स्तनदा मातांना पोषण आहार पुरवण्याचा योजना हाती घेण्याचा निर्णयही नगरसेवकांनी घेतला आहे.

महिला सक्षमीकरणासाठी नगरसेवकांचा पुढाकार
SHARES

महापालिका प्रशासनासोबतच नगरसेवक आपापल्या प्रभागांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. काही नगरसेवकांनी आपल्या विभागांत महिला आधार केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर काहींनी उद्यानांमध्ये बाळाला दूध पाजता यावं यासाठी स्तनदा मातांसाठी फिडींग कॉर्नर बनवलं आहे. तसेच गरोदर स्तनदा मातांना पोषण आहार पुरवण्याचा योजना हाती घेण्याचा निर्णयही नगरसेवकांनी घेतला आहे.


अर्थसंकल्पात विशेष तरतूद

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाकडून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जातं. निराधार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशिन तसेच घरघंटी खरेदीसाठी त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. महिलांसाठी हे कार्य होत असताना प्रशासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात बदल करून यंदाच्या सुधारीत अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांचा समावेश करण्यात आला आहे.


कुठल्या उपक्रमांचा समावेश?

महापालिकेच्या उद्यानांमध्ये माता बालकांसाठी फिडींग कॉर्नर निर्माण करणं, एड्सग्रस्त व्यक्तीच्या निधनानंत विधवा पत्नीला आर्थिक सहाय करणं, निराधार मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय करणं, महिला बचत गटांसाठी कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यासाठी योजना राबवणं,एकल महिलांना प्रोत्साहन देणं, महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवणं,

बलात्काराच्यासारख्या दुर्देवी घटनांनुसार जन्माला येणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच मातांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करणे, गरोदर स्तनदा मातांना पोषण आहार पुरवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे, महत्वाच्या ठिकाणी स्त्री आरोग्य देखभाल केंद्र उभारणे तसेच महिला बचत गटांसाठी कागदी पिशव्यांची निर्मिती करण्यासाठी योजना राबविणं आदी प्रकारची कामे सत्ताधारी पक्षाने सुचवून त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद केली आहे.


महिलांच्या रोजगारासाठी…

  • प्रभाग क्रमांक २०९ नगरसेवक व सभागृहनेते यशवंत जाधव यांनी विभागातील गरीब, गरजू व अपंग महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • तर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रभाग क्रमांक ११४ मध्ये गरीब, गरजू व दिव्यांग महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
  • शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी प्रभाग १६३ मध्ये विविध महिला बचत गटांना साहित्य पुरवण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
  • तर शिवसेनेच्या ऋतुजा तारी यांनीही प्रभाग १४३ मध्ये व्यायामशाळा व महिल आधार केंद्र बांधण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.


महिला आधार केंद्रासाठी आग्रही

शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी प्रभाग १४६ मध्ये, शिवसेना नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांनी प्रभाग १५५ मध्ये महिला आधार केंद्र बनवण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

भाजपाचे नगरसेवक दिपक तावडे यांनी प्रभाग २० मध्ये, तर भाजपाच्या स्वप्ना म्हात्रे यांनी प्रभाग १०० मध्ये महिला आधार केंद्रासाठी प्रत्येकी १० लाख रुपयांची आणि शिवसेनेच्या दिपमाला बढे यांनी प्रभाग ११३ मध्ये बालसंगोपन केंद्र उभारण्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

भाजपाच्या अंजली खेडकर यांनी प्रभाग १६ मध्ये, तर भाजपाच्या लिना पटेल-देहेरकर यांनी महिला आधार केंद्र बनवण्यासाठी १ लाख रुपयांची तरतूद केली आहे. भाजपाच्या योगिता कोळी यांनी प्रभाग ४६ मध्ये सोमवार बाजार, साईनाथ मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांना बॉक्स व कचरा पेट्या पुरवण्यसासाठी २० लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा