Advertisement

मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये प्रवेशबंदी, नाशिक दुर्घटनेनंतर बीएमसीचा निर्णय

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक होऊन २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे. या घटनेनंतर आता मुंबईत खबरदारी घेतली जात आहे.

मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये प्रवेशबंदी, नाशिक दुर्घटनेनंतर बीएमसीचा निर्णय
SHARES

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक होऊन २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे. या घटनेनंतर आता मुंबईत खबरदारी घेतली जात आहे. मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देऊ नका, असा आदेश रुग्णालयांना देण्यात आला आहे.

 मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली. नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देऊ नका असा आदेश रुग्णालयांना देण्यात आला आहे. तसंच १० मीटर दूरपर्यंत जाळ्या लावा, तिथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा, एकदा जाऊन सर्व सुरळीत आहे की नाही याची काळजी घ्या, असंही सांगण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

लिक्विड ऑक्सिजनसाठी यंत्रणा आणखी सुसज्ज करत असून कोविड सेंटर उभे करतानाच आपण सुरक्षेच्या सर्व गोष्टींची काळजी घेतली होती. आपण सगळ्याचे ऑडिट करत आहोत. खासगी रुग्णालयात असणाऱ्या बेड्स आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे रुग्णालयात ऑडिट होत आहे. ऑडिट आणि सुरक्षा एकत्र सुरू आहे, असंही पेडणेकर यांनी सांगितलं. 



हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा